शिक्रापूर (शेरखान शेख): इनामगाव (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून पुतण्यांनी चुलत्या सह चुलतीला कोयत्याने मारहाण करत मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सिद्धार्थ संतोष रणसुरे, शुभम संतोष रणसुरे, संतोष वामन रणसुरे या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
इनामगाव (ता. शिरुर) येथील राजेंद्र रणसुरे हे घरासमोर दारात बसलेले असताना त्यांनी पत्नीला जेवण मागत पत्नीशी बोलत असताना त्यांचा पुतण्या सिद्धार्थ याने कोणाला बडबड करतो, असे म्हणत हातात कोयता घेऊन मारहाण करु लागला. यावेळी राजेंद्र यांना सोडवण्यासाठी पत्नी संगीता आली यावेळी सिद्धार्थ चा भाऊ शुभम व वडील संतोष सुद्धा तेथे आले त्यांनी राजेंद्र यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्यांच्या पत्नीला मारहाण करत राजेंद्र यांचा मुलगा सागर याला जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत राजेंद्र वामन रणसुरे (वय ५२) रा. इनामगाव (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी सिद्धार्थ संतोष रणसुरे, शुभम संतोष रणसुरे, संतोष वामन रणसुरे सर्व रा. इनामगाव (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे हे करत आहे.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…