क्राईम

पुण्यात जावयाने सासुरवाडीला येत शिवीगाळ केल्याने सासऱ्याने जावयाला जागीच संपवल

पुणे: पुण्यामध्ये सासऱ्याने जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली. जावयाने सासरवाडीमध्ये येत सासरा आणि सासूला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर संतप्त झालेल्या सासऱ्याने जावयाचा गळा दाबला आणि त्याला जागीच संपवलं. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची सासऱ्याने गळा आवळून हत्या केली. सासऱ्याने गमजाने जावयाचा गळा आवळून आणि डोके फरशीवर आपटून हत्या केली. या घटनेमुळे फुरसुंगी परिसरात खळबळ उडाली. फुरसुंगी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता वडकी येथील कैलासनगरमधील वलवावस्ती येथे घडली.

पोलिसांनी सांगितले की, प्रशांत सुरेश जमदाडेने (वय ३५) दारूच्या नशेत येऊन सासू-सासऱ्याला शिवीगाळ केली. वाद विकोपाला गेल्यानंतर प्रशांत आणि सासरा सुरेश जमदाडे यांच्यात जोरदार भांडण झाले आणि त्यानंतर हाणामारी झाली. या हाणामारीत सासऱ्याने कापडी गमजाने प्रशांतचा गळा आवळून डोके फरशीवर आपटले. या हाणामारीत तो गंभीर जखमी झाला.

सासऱ्याने केलेल्या हल्ल्यात प्रशांत जमदाडे गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी सासरा सुरेश बाबूराव जमदाडे (वय ५९) याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

7 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

13 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

13 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

14 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

14 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

14 तास ago