शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिरूर तालुक्यातील वरुडे येथील राणमाळ वस्तीवर सोमवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत घराबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत व्यक्तीचे नाव बाळासो बबन तांबे (वय ४३) असे असून, ते आपल्या कुटुंबासह वरुडे येथे राहत होते. सोमवारी रात्री जेवणानंतर कुटुंबातील सदस्य घरात झोपले होते, तर बाळासो तांबे हे घरासमोरील कट्ट्यावर झोपले होते. रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वृद्ध आईला आरडाओरड ऐकू आल्याने ती बाहेर आली असता, अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून पळून जात असल्याचे तिने पाहिले.
दरम्यान, घरातील इतर सदस्य बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या घराचे दरवाजे बाहेरून कडी लावून बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. वृद्ध आईने कडी उघडल्यानंतर कुटुंबीय बाहेर आले असता बाळासो तांबे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी प्रकाश तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या थरारक हत्येमुळे वरुडे परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…
हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…
विजय वडेट्टीवारांचा घणाघात; जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक…