क्राईम

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीरंग ठकाजी अनोसे (रा. अनोसेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन कारवाई करण्यात आली आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, १ फेब्रुवारी २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हि घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिला वडापावसाठी पैसे देण्याचे आमिष दाखविले. तसेच धमकी देऊन तिच्यावर दोन वेळा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची नेमकी तारीख आठवत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत ती सुमारे सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार, वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध प्राथमिक माहितीच्या आधारे आरोपीविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम पॉक्सो कायदा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेसह धडाकेबाज कारवाई; महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

तीन घरफोडीचे गुन्हे उघड, आरोपीविरुद्ध यापूर्वी १४ गुन्हे दाखल; १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३०…

9 तास ago

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

21 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

21 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

21 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

21 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

21 तास ago