क्राईम

सणसवाडीत भरधाव कारच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय समोर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारच्या धडकेत इमाम दस्तगीर शेख या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय शेजारी तात्पुरत्या स्वरूपात रहिवाशी असलेले इमाम शेख हे 8 मे रोजी रात्रीच्या सुमारास रस्त्याचे कडेला पान टपरीवर चाललेले असताना अचानक एक कार भरधाव वेगाने अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने आली.

दरम्यान सदर कारची इमाम शेख यांना जोरदार धडक बसून अपघात झाला. यावेळी अपघातात इमाम शेख हे रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातातील सदर कार चालक कार घेऊन पळून गेला. सदर अपघातात इमाम दस्तगीर शेख (वय ४९) सध्या रा. कृष्णलीला मंगल कार्यालय शेजारी सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. टाकवडे इचलकरंजी ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत प्रशांत बाळू पाटील (वय ३९) सध्या रा. कृष्णलीला मंगल कार्यालय शेजारी सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. टाकवडे इचलकरंजी ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

12 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

12 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

12 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

12 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

18 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

18 तास ago