क्राईम

विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अश्लील कृत्य

पुणे: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या नराधम पोलीस सचिन सस्ते हा लघुशंकेचा बहाणाकरून हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटना जाणून घेतली.

बुधवार (दि. २५) डिसेंबर २०२४ रोजी मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येतो पण तसे असतानाही हा भयानक प्रकार घडला. यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये FIR क्र. ३५३/२०२४ नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाची तत्काळ गांभीर्याने दखल घेत उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना घटनेतील आरोपी सचिन सस्ते या पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत उचित कार्यवाही करावी व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची दक्षता घेण्याचे सूचित केले. तसेच, या प्रकरणात शासनाद्वारे योग्य कायदेशीर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्याचप्रकारे, पीडित मुलीच्या पालकांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करत धैर्य दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

हर्षवर्धन सकपाळ यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे का?

सकपाळ यांच्या निरर्थक आणि बिनबुडाच्या आरोपांवर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जोरदार घणाघात  मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

39 मिनिटे ago

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…

1 दिवस ago

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

2 दिवस ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

3 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

3 दिवस ago