क्राईम

पुणे नगर महामार्गाव अपघातग्रस्ताला मदतीच्या बहाण्याने दुचाकी लंपास…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर किरकोळ अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करण्याचा बहाणा करत दोघांनी सदर अपघातग्रस्त व्यक्तीची दुचाकी लांबवल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन 2 अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून रमेश फणसे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १४ एम आर २०१६ या दुचाकीहून चाललेले असताना फणसे रस्त्याच्या कडेला घसरुन त्यांची दुचाकी रस्त्याचे खाली गेली, दरम्यान फणसे दुचाकी वर घेत असताना 2 अज्ञात युवक तेथे आले त्यांनी फणसे यांना मदत करत दुचाकीवर घेण्याचा बहाणा केला. तसेच दुचाकीवर घेतल्यानंतर दोघे युवक फणसे यांची दुचाकी घेऊन पळून गेले.

याबाबत रमेश बबनराव फणसे (वय ५७) रा. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 2 अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कल्पेश राखोंडे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago