क्राईम

शिक्रापूरच्या सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांना ग्रामपंचायत कार्यालय समोर शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करुन जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे उध्दव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरू या सर्वांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे शनिवारी रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत समोरील हनुमान मंदिरा शेजारुन जात असताना उद्धव झोडगे यांनी त्यांचा एम एच १२ आर एन १८९१ हा टेम्पो नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचण होईल अशा पद्धतीने लावला होता. मुळे सरपंच गडदे यांनी झोडगे एस टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन उध्दव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरु या सर्वांनी मिळून रमेश गडदे यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ, दमदाटी जातीवाचक शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

घडलेल्या प्रकाराबाबत सरपंच रमेश बबनराव गडदे (वय ४८) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी उध्दव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरु (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्याविरुद्ध मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago