क्राईम

शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिसावर धारदार शस्त्राने वार…

शिरूर (शेरखान शेख): शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे नेमणूकीस असताना दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिरूर मधील जोशीवाडी, गवळी वीट भट्टी जवळ, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी रोडवर मंगळवारी (ता. २७) रात्री पावणे आठच्या सुमरास ही घटना घडली आहे. पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे यांच्यावर हल्ला करून दोघे जण फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी की, शिरूर पोलिस स्टेशनमधील चालक पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे सदर ठिकाणावरून चालत जात असताना, त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती मोटर सायकल ढकलत रोडने चालले होते. श्री. नागरे यांना विचारले की पेट्रोल पंप कुठे आहे? पेट्रोल टाकायचे आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिरूर गावामध्ये व हायवेवर पण पेट्रोल पंप आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांना विचारले की, तुम्ही मोटर सायकल ढकलत का चालले आहात. त्यावेळी त्यांनी तुम्ही कोण आहात? असे विचारले असता, त्यांना पोलीस आहे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी पोलिसावर कोयत्या सारख्या धारदार हत्याराने वार करून पळून गेले. या घटनेत श्री. नागरे गंभीर जखमी झाले आहेत.

सदर जखमी पोलिसावर शिरूर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मानेवर पाठीमागील बाजूस वार झालेने खोलवर जखम झालेली आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात औषध उपचार चालू आहे. शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकांमार्फत पळून गेलेल्या अज्ञात दोन हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago