क्राईम

शिरूर एसटी स्टॅण्डवर बसमध्ये चढताना चोरट्याने मारला डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून सुमन रघूनाथ आमराळे (रा. कुरुळी ता. शिरूर) या महिलेचे तिच्या गळ्यातील एक तोळा वजनी असलेली सोन्याची पानपोत त्यास दोन शिपले व पाव सोन्याचे मनी असलेले अंदाजे ३५,००० रुपये किमतीचे दागिणे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.

सुमन रघूनाथ आमराळे यांनी चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दाखल केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस नाईक जगताप हे करत आहे.

शिरूर शहरात दसऱ्याच्या निमित्ताने सोने, कपडे, किराणा खरेदीसाठी ग्रामीण भागातून नागरीक मोठया प्रमाणावर येत आहे. या गर्दीचा फायदा उठवून चोरटे डल्ला मारत आहे. महिलांनी आपआपले दागिणे व्यवस्थित सांभाळावे, असे आवाहन शिरूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

14 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

14 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

17 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

17 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

17 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

17 तास ago