क्राईम

म्हणून पुणे पोलिसांनी रात्री तीन वाजता पार्किंगमध्ये रचला सापळा अन् पहाटे…

महिलेला फसवून शरीरसंबंध ठेवले; दोनदा गर्भपात, खुनाचाही आरोप

पुणे: पुण्यात मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने दोनशेपेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर तीन रात्री जागून वीसपेक्षा अधिक सोसायट्यांच्या पार्किंगची तपासणी करून आरोपीची गाडी शोधली आणि सापळा लावून त्याला पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. विशाल लक्ष्मण भोले (वय 32, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची फसवणूक करून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याच्या आरोपावरून विशाल लक्ष्मण भोले यांच्यावरती 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने लग्न झाले नसल्याचे सांगून महिलेला फसवले होते. महिलेसोबत संबंध ठेवले त्यानंतर तिला जबरदस्तीने दोन वेळा गर्भपात करायला भाग पाडले. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगला थिएटरसमोर 2023मध्ये झालेल्या एका खूनाच्या प्रकरणातही विशाल भोले हा मुख्य संशयित आरोपी आहे. गुन्हा घडल्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी दोन वर्षांपासून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. मात्र, तो सापडला नव्हता. आता त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलं आहे.

‘सीसीटीव्ही’ तपासत पोलिस पोहोचले धायरी अन्…

पोलिस आरोपीचा शोध घेत असताना विशाल भोले ताडीवाला रस्ता परिसरात मित्राला भेटून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी सीसीटीव्ही तपासले. यामध्ये संशयित आरोपी हा निळ्या रंगाच्या मोपेडवरून जाताना दिसला. पोलिसांनी ताडीवाला रस्त्यापासून आरोपीचा माग काढायला सुरूवात केला. धायरीतील धायरेश्वर मंदिरापासून काही अंतरापर्यंत आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसत होता. मात्र, त्यानंतर सीसीटीव्हीची साखळी तुटली. त्यात आरोपी दिसेनासा झाला. त्यानंतर पोलिसांनी शोध घ्यायला सुरूवात केली

सोसायटीत दिसली ती निळ्या रंगाची मोपेड

जिथे साखळी तुटली तिथपासून पोलिसांनी शोध घ्यायला सुरूवात केली. संबंधित रस्त्यावर पुढे 20 ते 25 सोसायट्या होत्या. आरोपी याच सोसायटीत कुठेतरी तरी राहत असावा, अशा संशय पोलिसांना आला. त्यामुळे त्यांनी या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आरोपीची निळ्या रंगाची मोपेड दिसते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार 29 जुलैला मध्यरात्रीनंतर त्यांनी सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये गाडी शोधण्यास सुरुवात केली. 31 जुलैला मध्यरात्री एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये संशयित निळी मोपेड दिसली. पोलिसांनी तेथे सापळा लावला. आरोपीला व्यायामाची आवड होती. तो पहाटेच व्यायामासाठी बाहेर पडायचा. त्यानुसार पहाटे साडेचार वाजता तो बाहेर आला असता, पोलिसांनी त्यला ताब्यात घेतलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago