क्राईम

त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी

पीडित महिलेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे; डॉ. नीलम गोऱ्हे

परभणी: परभणी येथे (दिनांक ३) जानेवारीच्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी अतिशय भयानक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तिथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. याची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी आज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व या घटनेत आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल याबाबत सूचना केल्या.

याप्रकरणी सूचना करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, साक्षीदार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत पीडित कुटुंबाला संरक्षण दिले जावे व पीडित कुटुंबाला सामाजिक दृष्टिकोनातून त्रास होत असले तर त्यांना निकाल लागेपर्यंत दुसऱ्या ठिकाणी निवासाची व उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी. आरोपीला तत्काळ अटक करावी.

पीडित महिला व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे व पीडित महिलेला कौटुंबिक त्रास होणार नाही यासाठी खास लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तत्काळ तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावा व त्याला तत्काळ मान्यता कशी मिळेल यासाठी पाठपुरावा करावा. याघटनेत विशेष सरकार वकील नेमत असताना पूर्वी ज्या वकिलांनी दोषसिद्धी मिळाली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे.

महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करून घेण्यात यावी, अशा महत्त्वाच्या सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांना केल्या. या सूचनांचा परदेशी यांनी स्वीकार केला असून तत्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

55 मिनिटे ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

8 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago