क्राईम

त्या कलाकेंद्रात चालायचा कुंटणखाना; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून केला पर्दाफाश

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरण राज्यभरात गाजले. अशात पोलिसांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सारूळ पाटीजवळील एका कलाकेंद्रावरील कुंटणखान्याचा भांडाफोड केला आहे.

पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला. यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने दोन पीडितांची सुटका केली. यातील एक पीडिता गुजरातमधील आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन पुरुष व एका महिलेविरोधात गुन्हा नोंद झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील सारूळ पाटीजवळ रेणुका कला केंद्रात देहविक्री व्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांना मिळाली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्यासह पथक घेऊन सारूळ गाठले. त्या ठिकाणी डमी ग्राहक पाठवला. छाप्यात पीडितांकडून देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या मीना संतोष खराडे हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेली रक्कम जप्त केली

या ठिकाणी गुजरात आणि इतर जिल्ह्यांतून पीडित महिलांना आणून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी शेख शफीक शेख हमीद (रा. परभणी) आणि जागामालक रामनाथ ढाकणे (रा. सारूळ) आणि मीना खराडे या तिघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक गात, पोलिस उपनिरीक्षक जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, महिला पोलिस हवालदार उषा चौरे, शोभा जाधव, पोलिस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलिस शिपाई प्रदीप वीर, योगेश निर्धार यांच्या पथकाने केली

कळंबच्या कला केंद्रात गोळीबार?

सोमवारी (4 ऑगस्ट) चोराखळी येथील महाकाली कला केंद्रसमोर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता. याचा व्हिडीओही परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण दौंडप्रमाणाचे हे प्रकरणही दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये गोळीबाराचा उल्लेख करण्यात आला नाही. पोलिसांनीही या प्रकरणात गोळीबाराचा उल्लेख केलेला नाही.

या प्रकरणी हाणामारी आणि जीवे मारण्याची धमकी अशी परस्परांविरुद्ध तक्रार देण्यात आली. त्यानुसार 9 जणांसह इतर अनोळखी 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण यात गोळीबाराचा उल्लेख टाळण्यात आला आहे. तपासाचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून पोलिसांनीच गोळीबार प्रकरण दाबल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे. या हाणामारीमध्ये 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर धाराशिव येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

16 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

16 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago