शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या फार्म हाउसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चोवीसवा मैल येथे ओमप्रकाश जाधव यांनी फार्म हाउस बांधलेले असून ते पुणे येथे नोकरीला आहेत. मात्र शनिवार रविवारी ते त्यांच्या फार्म हाउसवर येत असतात नेहमीप्रमाणे जाधव हे १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या फार्म हाउसवर आले असता त्यांना दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहिले असता चिखलाचे पाय उमटल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील टीव्ही, सिलेंडर, गॅस शेगडी सह काही साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.
याबाबत ओमप्रकाश रघुनाथ जाधव (वय ५४) सध्या रा. आंबेडकर चौक वारजे पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…