औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सिग्नल तोडल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शहरातील क्रांती चौकात हा सर्व प्रकार घडला असून, मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
एका चारचाकी वाहनचालकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. ज्यात स्प्लेंडरवरून आलेल्या एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलीस मारहाण करताना पाहायला मिळत आहे. आपल्या गाडीवरून उतरून काही सांगण्याच्या आत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण सुरु केली. दुचाकीस्वाराच्या कानशिलात लागवत त्याला पाठीमागून लाथा देखील मारल्या. तरुण काही सांगण्याचा प्रयत्न करत असताना वाहतूक पोलिसाकडून मारहाण सुरूच होती. शेवटी दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांने तरुणाला बाजूला नेले. पण त्यानंतर देखील त्या वाहतूक पोलिसाची मारहाण सुरूच होती.
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…