शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील जॉन डियर कंपनीमध्ये कामाला आलेल्या कामगाराने दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेल्या मोबाईल व पाकीटसह दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील जॉन डियर कंपनीमध्ये शुभम साळुंके हा कामगार कामाला आलेला असताना त्याने कंपनीमध्ये मोबाईल बंदी असल्याने त्याचा मोबाईल त्याच्या ताब्यातील एम एच १२ एम झेड २१७६ या दुचाकीचे डिकीमध्ये ठेवून दुचाकी कंपनीच्या बाहेरील पार्किंगमध्ये लॉक करुन ठेवली होती. रात्री 11 नंतर शुभम कंपनी सुटल्यानंतर बाहेर आला असता पार्किंगमध्ये दुचाकी दिसून आली नाही, त्यामुळे आजूबाजूला पाहणी केली असता दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत शुभम छन्नू साळुंके (वय २२) रा. औरा सिटी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे हे करत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…