पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या एरंडवणे भागात एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पत्नीच्या तिच्या पतीच्या विरोधात अलंकार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवी (वय ३५ वर्षे, राहणार एरंडवणे) याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. रवी त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. रवी त्याच्या पत्नीचा सतत छळ करत असे. रविवारी (२० जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास रवीने त्याच्या पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने पत्नीला मारहाण केली, या मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाला.
रवीने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. पत्नीच्या पोटावर जोरात ठोसा मारला. शिवीगाळ करत तिचे केस धरुन फटफटत नेले. मारहाणीदरम्यान तिच्या पोटातून रक्तस्त्राव व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर जखमी पत्नीला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान मारहाणीमुळे गर्भपात झाल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील सासवड-नारायणपूर रस्त्यावर भिवडी येथील चौधरी वस्तीजवळ एक भीषण अपघात घडला. डिझेल टँकरने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…