क्राईम

फर्निचरच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; डोळ्यात तिखट टाकून धारदार शस्त्राने वार

गडचिरोली: फर्निचर देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील लांझेडा वॉर्डात घडली. या घटनेमुळे गडचिरोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सचिन रामचंद्र कोलूरवार (वय ३५, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव असून महेश महादेव बुरांडे (वय ३४, रा. लांझेडा वॉर्ड, गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या पुणे येथील एका पोलिस अधिकाऱ्याने सागवानाचे फर्निचर तयार करून देण्यासाठी महेश बुरांडे याला सुमारे दोन लाख रुपये दिले होते. मात्र पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही फर्निचर तयार करून देण्यात आले नव्हते. याबाबत वारंवार विचारणा केली जात होती. आठ दिवसांपूर्वी सचिन कोलूरवार आणि त्याचा एक साथीदार त्या पोलिस अधिकाऱ्याच्या वतीने महेशच्या घरी गेले होते व कोणत्याही परिस्थितीत फर्निचर तयार ठेवण्याचा इशारा दिला होता.

तिखटाचा वापर अन् शस्त्राने वार

सोमवारी दुपारी सचिन आणि त्याचा मित्र वाहन घेऊन फर्निचर नेण्यासाठी पुन्हा महेशच्या घरी गेले. मात्र काही फर्निचर अद्याप तयार नसल्याचे पाहून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या महेशने अचानक सचिनच्या डोळ्यांत मिरचीचे तिखट फेकले. सचिन काही समजण्यापूर्वीच महेशने फर्निचर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार वाकसाने त्याच्या छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी

भरदिवसा शहरात खुनाची घटना घडल्याने लांझेडा वॉर्ड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरू

घटनेनंतर आरोपी महेश बुरांडे हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चिमुकली पितृप्रेमाला पारखी

दरम्यान, सचिन कोलूरवार याचा चामोर्शी मार्गावरील संविधान चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पानठेला होता. सहा वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला साडेतीन वर्षांची एक मुलगी आहे. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चिमुकली पितृप्रेमाला पारखी झाली आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर कुटुंबीयांनी टाहो फोडल्याने परिसरात शोककळा पसरली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

14 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

21 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

21 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

2 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

3 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

3 दिवस ago