मुंबईः ‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर’, अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
अभिनेता प्रथमेश परब याने होणाऱ्या पत्नीसोबतचा केळवणाचा फोटो शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की,”#pratija चं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. तारीख खूपच स्पेशल आहे. हिंट कॅप्शनमध्येच आहे. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”. या पोस्टवर यंदा कर्तव्य आहे, केळवण स्टोरीज, लग्न, साखरपुडा, तयारी सुरू असे हॅशटॅगही त्याने दिले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी प्रथमेश लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
प्रथमेश परब याच्या मैत्रिणीचे नाव क्षितिज घोसाळकर असून, तो म्हणाला, ‘कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये क्षितिज काम करते. ती शिक्षिका आहे. क्षितिज आणि माझं लव्हमॅरेज आहे. इंस्टाग्रामवर आम्ही आधी भेटलो. गप्पा मारताना आमची छान मैत्री झाली. ‘टाईमपास 3’च्या शूटिंगदरम्यान आम्ही ठाण्यात पहिल्यांदा भेटलो. पुढे आमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता आम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे.’
दरम्यान, प्रथमेश परब याने ‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘टकाटक’ अशा चित्रपटात भूमिका साकारली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…