मनोरंजन

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी दिपाली शेळके यांची निवड

शिरुर (किरण पिंगळे) बालरंग भूमीच्या सदस्यांनी अध्यक्ष पदासाठी माझी निवड करुन माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांची आभारी असुन बालरंगभूमीच्या परिषदेच्या माध्यमातून आगामी काळात अनेक नवनवीन उपक्रम घेतले जाणार असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत परिषदेचे उपक्रम पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय बाल रंगभुमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा दिपाली शेळके यांनी केले.

निळू फुले कला अकादमी,पुणे येथे अखिल भारतीय बालरंगभूमी परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या नूतन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली. बालरंगभूमीचे प्रमुख पदाधिकारी उदय लागू, दीपक रेगे, अरुण पटवर्धन, सुरेश देशमुख, रवींद्र सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी अध्यक्ष म्हणुन दिपाली शेळके यांची निवड करण्यात आली. भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न शाखा म्हणून बालरंग भूमिपरिषद २०१७ पासून पुणे जिल्ह्यात कार्यरत असुन मुलांसाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देत वर्षभर सातत्याने नाट्य स्पर्धांचे आयोजन करत असते.

नूतन कार्यकारणी खालील प्रमाणे

अध्यक्ष :- दिपाली शेळके (शिरुर)

उपाध्यक्ष :- अरुण पटवर्धन

उपाध्यक्ष :- नारायण करपे (खेड)

कार्याध्यक्ष :- दीपक रेगे

प्रमुख कार्यवाहक :- देवेंद्र भिडे

सहकार्यवाहक :- जतीन पांडे

सहकार्यवाह :- प्रकाश खोत (बारामती)

खजिनदार :- सत्यम कोठावदे

सहखजिनदार :- संध्या धुमाळ (हवेली)

कार्यकारणी सदस्य:- गिरीश भुतकर (भोर), सुधीर कदम (इंदापूर), अनुराधा काळे (आंबेगाव), प्रभा काळे (मावळ), मुग्धा वडके, स्मिता मोघे राजेंद्र आलमखाने यावेळी चंद्रकांत बुट्टे, प्रमोद पारधी, राजाराम गायकवाड, वैशाली पोतदार, विजयकुमार तांबे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

13 तास ago

Video; न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात

शिंदोडी (तेजस फडके) न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात…

14 तास ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

2 दिवस ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

2 दिवस ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

4 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

4 दिवस ago