मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचे शूटिंग बिडकीन येथील ‘ डीएमआयसी’त होणार असून ‘जवान’ हा एक ॲक्शनपट आहे जून २०२३ मध्ये तो रिलीज होणार आहे.
सध्या हा पिक्चर सध्या निर्मिती प्रक्रियेत असून पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई येथे शूटिंग होणार आहे. मात्र, चित्रपटातील भरधाव गाड्यांचा थरार शूट करण्यासाठी या मेट्रो शहरात जागा नसल्याने औरंगाबाद नजीकच्या बिडकीनची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शाहरुख खानच्या ‘रेड चिली प्रॉडक्शन’चे अधिकारी प्रयत्नशील होते. अखेर त्यांना चित्रिकरणासाठी परवानगी मिळाली असून सर्व यंत्रणा चित्रीकरणस्थळी पोहोचली आहे.
शाहरुख येणार की नाही?
मिळालेल्या माहितीनुसार ‘बॉडी डबल’च्या माध्यमातून ॲक्शन सीनचे शूटिंग करण्यात येणार असल्याचे समजते. परदेशातील काही ॲक्शन कलाकारही यात सहभागी होणार असून गर्दीला ताब्यात ठेवण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय शूटिंग खूप आतमध्ये असल्याने डीएमआसीतील सर्व अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…