भविष्य

जाणून घ्या आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात कशी असेल…

मेष: आजचा दिवस कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात जाईल. घराची देखभाल चांगली होईल. सशक्त आणि उत्साही वाटेल. तुम्ही असे काही काम देखील कराल ज्यामुळे तुमची सर्जनशीलता दिसून येईल.

वृषभ: व्यवसायात गुंतवणुकीतून फायदा होईल. नात्यात सावध राहा. कोणाशीही भांडण करू नका.

मिथुन: ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

​कर्क: आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही काहीसे स्वार्थी असाल. काही लोक तुमचा विरोध करतील आणि तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका होऊ शकते. या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला तुमच्या कामात झोकून द्याल.

​सिंह: कोणत्याही पॉलिसी किंवा मालमत्ता इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे आणि तुम्ही तुमच्या हुशारीने आणि समजूतदारपणाने महत्त्वाची कामे पूर्ण कराल. जवळच्या व्यक्तीला भेटणे फायदेशीर ठरेल. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी रहाल. दिवसाच्या उत्तरार्धात कोणत्याही वाईट बातमीमुळे मन निराश होईल.

​कन्या: नकारात्मक सवयी बदलण्याचा प्रयत्न करा त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वाईट गोष्टींवर ताण देऊ नका. प्रियजनांचे कडू बोलणे ऐकून मन उदास राहील. यावेळी इतरांच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

तूळ: जमिनीशी संबंधित कोणतेही काम चालू असेल तर तुम्हाला अनुकूल परिणाम मिळू शकतात. सामाजिक कार्यात तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. इतर लोकांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

​वृश्चिक: आज अचानक एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची साथ मिळेल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. प्रभावशाली लोकांच्या भेटीगाठी आणि विचारांची देवाणघेवाण केल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल. घाईत घेतलेले निर्णय चुकीचे परिणाम देऊ शकतात. तुमची कामे हुशारीने करा.

​धनु: आज तुमच्या जीवन सकारात्मक आणि आनंदी ठेवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्ही एखाद्या खास व्यक्तीलाही भेटू शकता. झटपट यश मिळविण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर करु नका, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. व्यावसायिक उपक्रमांना चालना देण्यात तुमची मेहनत यशस्वी होईल.

​मकर: आज तुम्हाला योग्य यश मिळेल. भावनिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असाल आणि साक्षामासाने आवश्यक देखील आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी काळ अनुकूल आहे. इतर कोणालाही तुमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करु देऊ नका.

कुंभ: आज विशेष व्यक्तीशी सामाजिक संपर्क वाढवावा. जीवनात स्थिरता येईल. तुमच्या स्वभावात गंभीरता तसेच संयम बाळगा. मनात विविध प्रकारच्या शंका येऊ शकतात. सर्व समस्यांवर मात करण्यासाठी व्यक्तीने कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. यावेळी तुम्हाला व्यवसायात खूप स्पर्धेला सामोरे जावे लागू शकतो.

मीन: दैनंदिन जीवनात काही बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशील आणि मनोरंजक उपक्रमांमध्ये वेळ घालवा. एखाद्या गोष्टीबद्दल निराशा होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता. या काळात मनावर ताबा ठेवा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago