भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: धार्मिक आणि सामाजिक कार्याला हातभार लावाल. ज्यांचे कोर्ट-कचेरीच्या समस्या आहेत त्या मार्गी लागतील. परदेशात जाण्यासाठी अनुकूल दिवस. जोडीदाराशी तडजोड स्वीकारावी. व्यापारी उधारी करू नये.

वृषभ: व्यापारी वर्गासाठी अनुकूल दिवस. केवळ व्यवहार करताना कदाचित चिडचिड होण्याची शक्यता असल्यामुळे शांत रहावे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खोटी आश्वासने देवू नयेत. आजारी व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी. अभ्यासात बौद्धीक मदत मिळेल.

मिथुन: नोकरदारांनी स्वताची जबाबदारी दुसर्‍यांवर टाकू नये. खेळ, कला क्षेत्रात उत्तम संधी मिळेल. अविवाहितांचे विवाह जुळूनयेण्याचे योग आहेत. जोडीदारासाठी हौशीने खर्च कराल. अभ्यासाव्यतिरिक्त दुसर्‍या गोष्टीत मन रमेल.

कर्क: व्यापारी वर्गाने व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नये. सरकारी नोकरदारांची बदलीचे योग संभवतात. खाजगी नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी मिळेल. प्रिय व्यक्तींशी वाद घालू नये. गुंतवणूक करताना घाईत निर्णय घेऊ नये.

सिंह: उत्साहवर्धक दिवस. प्रिय व्यक्तींशी गाठभेट होण्याची शक्यता. परंतु, समोरच्या व्यक्तीच्या लहरीपणाचा अनुभव येऊ शकतो. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. अभ्यासाला गुरुजनांची मदत मिळेल. हाताला दुखपत होण्याची शक्यता आहे.

कन्या: भागीदारीत किंवा महत्वाच्या गोष्टींसाठी करारपत्र करण्यास अनुकूल दिवस. धार्मिक गोष्टींत सहभाग घ्याल. कौटुंबिक गोष्टीत काही घटना मनाविरुद्ध होण्याची शक्यता आहे. काहींना विनाकारण मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता आहे.

तुळ: ज्यांचे परदेशात जाण्याचे ठरत आहे त्यांनी जास्त प्रयत्न करावे. खेळ, कमिशन, कला, जाहीरात क्षेत्रात यश मिळेल. व्यापारी वर्गासाठी मध्यम दिवस.

वृश्चिक: नवीन उपक्रम राबविण्याची संधी मिळेल. घरच्यांसाठी खरेदी कराल. अविवाहितांचे विवाह जुळून येण्याचे योग. नोकरीत विनाकारण वाद घालू नये. नोकरी सोडण्याचे विचार मनात येतील.

धनु: चांगल्या लोकांचे घरी येणे-जाणे राहील. वास्तुत आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न कराल. आपल्या बोलण्याने दुसर दुखावेल. खेळाडूंसाठी उत्तम दिवस. मित्र-मैत्रिणींशी वाद घालू नका.

मकर: विमा एजंट, इस्टेट, कमिशन या क्षेत्रात उत्तम संधी मिळतील. शेअर्स, सट्टा यात विचार करुनच गुंतवणूक करावी. सरकारी वर्गाने लाल घेऊ नये. पुढे त्रास होईल. विद्यार्थी वर्गासाठी अनुकूल दिवस आहे.

कुंभ: दुसर्‍यांसाठी मदतीचा हात पुढे कराल. कोणालाही उसने पैसे दिल्यास परत येणार नाहीत. नातेवाईकांशी वाद घालू नये. उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता.

मीन: उद्योग व्यवसायासाठी समोरुन सकारात्मक निर्णय मिळतील. एजंटसाठी अनुकूल दिवस. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. प्रेमात यश मिळेल. वायफळ खर्च टाळा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

3 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago