मुख्य बातम्या

शिरुर; शरद सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई…

शिरुर (तेजस फडके) शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शरद सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणी दाखल असलेल्या सर्व केसेस मागे घेण्याकरीता राजाराम मारुती डेरे या वसुली अधिकाऱ्याने २ लाख २१ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी वसुली अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असुन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी शिरुर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. याबाबत एका ४२ वर्षीय व्यक्तीने लाचेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सन २०१३ मध्ये त्यांच्या मित्रासाठी शरद सहकारी बैंक, शाखा शिक्रापुर येथील तीन कोटी रुपयाच्या कर्ज प्रकरणास जामीनदार राहीले होते. कर्जदार हे रक्कम भरण्यास अपात्र झाल्याने कर्जदार व जामीनदाराविरुद्ध विविध केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. सदर कर्जाची रक्कम थकल्याने अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वसुली अधिकारी राजाराम डेरे यांची नियुक्ती केली होती.

 

शिरुर तालुक्यातील तक्रारदार यांनी जामीनदार म्हणून नैतिक जबाबदारी स्विकारुन मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करुन उर्वरित कर्जाची सर्व रक्कम जामीनदार या नात्याने कर्ज खात्यात भरली व कर्ज बाकी नसल्याचा बँकेकडून दाखला घेतला. तक्रारदार यांनी बँकेच्या संचालक मंडळास कर्ज वसुलीच्या दरम्यान लावलेल्या सर्व केसेस मागे घेण्याबाबत विनंती अर्ज केला होता.

 

त्याला शिक्रापुर येथील शरद सहकारी बँकेने मान्यता दिली व तसा आदेश बँकेने वसुली अधिकारी राजाराम डेरे यांना दिला होता. त्याबाबत तक्रारदार हे वसुली अधिकारी राजाराम डेरे यांचेकडे पाठपुरावा करीत होते. दरम्यान, वसुली अधिकारी राजाराम डेरे यांनी तक्रारदार यांच्याकडे थकीत कर्ज प्रकरणी दाखल केलेल्या सर्व केसेस मागे घेण्याकरीता ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

 

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता. लोकसेवक राजाराम डेरे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरुध्द कर्ज प्रकरणी दाखल असलेल्या सर्व केसेस मागे घेण्याकरीता कर्जाच्या प्रिन्सीपल रक्कमेच्या १ टक्के म्हणजेच ३ लाख २८ हजार रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती २ लाख २१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी राजाराम डेरे याच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

7 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

8 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

8 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

8 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

8 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

8 तास ago