रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वडा पाव, कच्छी दाबेली, ओली भेळ तसेच इतर फास्ट फूड खाण्यासाठी हातगाड्या उभ्या असतात. तसेच पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावात स्वीट होमचा सुळसुळाट झाला असुन यामध्ये मोठया प्रमाणात फास्ट फुड, जंक फुडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ विकले जातात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याचा (Helth) प्रश्न ऐरणीवर आला असुन रांजणगाव येथील एका स्वीट होम मधुन मुलांना खाण्यासाठी नेलेल्या मिठाईत मेलेली अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
शिरुर तालुक्यात सध्या झपाट्याने औद्योगिकीकरण वाढतं असुन महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून कामगार वर्ग औद्योगिक वसाहतीत पोटाची खळगी भरण्यासाठी येत आहे. शिरुर तालुक्यात कोरेगाव भिमा, वढु बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी, रांजणगाव गणपती आणि करडे परिसरात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या असुन त्यामध्ये लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे या औद्योगिक वसाहतीच्या परीसरातील गावांमध्ये मोठया प्रमाणात स्वीट होम आणि छोटया छोटया टपऱ्यावर फास्ट फुड तसेच जंक फुड खाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. परंतु यामध्ये मिळणारे खाद्यपदार्थ दर्जेदार आहेत कां…? याची खात्री न करताच सर्वसामान्य लोक हे खाद्यपदार्थ खाऊन स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु त्यामुळे गंभीर आजरांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे स्वीट होम किंवा टपरीवरुन कोणताही खाद्यपदार्थ विकत घेताना त्याचा दर्जा तपासने गरजेचे आहे.
स्वीट होम मधील खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे…?
स्वीट होम किंवा टपरी मध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ खरंच दर्जेदार आहेत कां याची तपासणी होणं गरजेचं आहे. कारण रांजणगाव गणपती येथील ‘जय भवानी मिठाईवाले’ या स्वीट होममधून दि 14 मे 2023 रोजी एका ग्राहकाने लहान मुलांना खायला मिठाई नेली होती. त्यामध्ये मेलेली अळी सापडल्याने त्या ग्राहकाने याबाबत स्वीट होम चालविणाऱ्या व्यक्तीला याबाबत जाब विचारला असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर मात्र स्वतःची चुक मान्य करत मिठाईत मेलेली अळी असल्याचे मान्य केले.
अन्न, औषध विभागाची डोळेझाक…?
पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यात हा सगळा सावळा गोंधळ चालु असताना अन्न आणि औषध प्रशासन विभाग याबाबत डोळेझाक कां करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. शिरुर तालुक्यात जेवढे स्वीट होम आहेत. त्यांच्याकडे फुड लायसन्स आहेत कां…? तसेच त्यामध्ये बनवले जाणारे पदार्थ दर्जेदार बनवले जातात कां…? याची तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा फास्ट फुड आणि जंक फुडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ विकून सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबनार कधी…? असा प्रश्न निर्माण होत आहे.
(क्रमशः)
माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी
शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या…
शिरुर (तेजस फडके) रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर तसेच…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील चांडोह येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलाला व…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : ग्रामीण भागात रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने शासनाने आरोग्य…
शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…