रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिक्रापुर येथे नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) मार्च रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतात असणाऱ्या विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मांडगे यांनी नक्की आत्महत्या का…? केली याबाबत चर्चाना उधाण आले होते. त्यांच्या मृत्यूस त्यांची पत्नी, सासरा आणि मेहुणा जबाबदार असल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे यांची बहीण मनिषा इथापे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये दिली असल्याने पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत जितेंद्र मांडगे यांची पत्नी 1) पुजा जितेंद्र उर्फ हरीभाऊ मांडगे (वय 27 वर्षे) सासरे 2) संजय बबन दळवी (वय 53 वर्षे), मेहुणा 3)शशांक संजय दळवी( 29 वर्षे) सर्व रा.हंगा,ता पारनेर, जि अहमदनगर यांनी मयत जितेंद्र उर्फ हरीभाऊ केशव मांडगे हे शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे नेमणुकिस असताना त्यांच्यावर सुपा पोलीस ठाणे, ता. पारनेर,जि. अहमदनगर.येथे वेगवेगळे दखलपात्र गुन्हे दाखल केले होते. तसेच अटकेच्या भीतीने तसेच मांडगे यांची पत्नी पुजा हिने घटस्फोट घेण्यासाठी 36 लाख रुपये तसेच 7 एकर जमिनीची मागणी करुन पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे यांचा शारीरिक व मानसिक छळ करुन त्यांना गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्या पत्नीसह, सासरा व मेहुणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…