मुख्य बातम्या

वढू बुद्रुक मध्ये पुष्पराज स्टाईलने कंपनीच्या कंपाउंडच्या आतमध्ये घुसून चंदनचोरी

शिक्रापुर (शेरखान शेख) वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या कंपाउंडच्या आतमध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी ‘पुष्पराज’ फिल्मच्या स्टाईलने चोरी करत चंदनाची दोन झाडे चोरुन नेत नंतर देखील काही झाडे चोरण्याचा प्रयत्न केला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वढू बुद्रुक येथील ‘युनी क्लींगर’ कंपनीच्या आतमध्ये काही वर्षांपासून चंदनाची काही झाडे आहेत. २३ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारस अज्ञात चोरटे कंपनीच्या कंपाउंडचे पत्रे कापून कंपनीच्या आतमध्ये आले. त्यांनी दोन चंदनाची झाडे तोडून चंदन चोरुन नेली.दरम्यान कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी याबाबत कंपनी व्यवस्थापकांना माहिती दिली. त्यांनतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास काही चोरटे पुन्हा सिनेस्टाईलने कंपनीच्या आतमध्ये चंदनाची झाडे तोडण्यासाठी आले. मात्र यावेळी चोर आल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी कंपनीतील सायरन वाजवले असता चोरटे शेजारील शेतात पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत महेश सुधाकर अवचट (वय ५४) रा. नवशा मारुती मंदिर जवळ,सिंहगड पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago