मुख्य बातम्या

शिरुरसह श्रीगोंदा तालुका हादरला…शिरुर-श्रीगोंदा शिवेवर तरुणाचा निर्घुण खून

शिरुर (अरुणकुमार मोटे) बीडच्या मस्साजोग नंतर शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर निर्घुण खून झाला असून यात एका तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय तोडला असुन एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह आळढून आल्याने शिरुरसह श्रींगोदा तालुक्यातही मोठी खळबळ उडाली आहे.

 

याबाबत खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार शिरुर व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) या ठिकाणी १८ ते २२ वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला आहे. या मृतदेहाचे शीर, दोन हात ,व एक पाय नसल्याचे दिसुन आले आहे. तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. हा मृतदेह शिरुर येथुन दाणेवाडी येथील शिरुर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

 

या मृतदेहाचे शीर दोन्ही हात व पाय अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे हा मृतदेह नक्की कोणाचा याबाबत शंका-कुशंका सुरु असुन दानेवाडी (ता .श्रीगोंदा) येथील माऊली सतिश गव्हाणे हा १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुण ७ मार्च २०२५ पासुन बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते परशुराम गव्हाणे यांनी सांगितले. याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. परंतु हा मृतदेह नक्की त्या तरुणाचा आहे की आणखी कोणाचा याबाबत अजुनही शंका आहे.

 

शिरुर पोलीस स्टेशन येथे आज (दि १२) रोजी मिसिंग तरुणाचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली असुन दाणेवाडी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांच्यात मुलाचा असू शकतो परंतु मृतदेहाचे शीर, दोन्ही हात, उजवा एक पाय नसलेला, डावा पाय अर्धा तुटलेला अवस्थेत सापडल्याने कुटुंबही द्विधा मनस्थिती मध्ये आहे.

 

सदर मिसिंग युवकाबाबत चौकशी सुरु असुन सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जमा करण्याचे काम सुरु आहे. दाणेवाडी येथील मृतदेह बाबत माहिती गोळा करण्याचे काम आहे सुरु असुन शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग, श्रीगोंदा पोलीस, अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तपासासाठी रवाना झाली आहे.

    संदेश केंजळे, 

            पोलीस निरीक्षक (शिरुर) 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

14 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago