मुख्य बातम्या

शिरुर; बाभुळसरच्या ‘श्रावणी वाळके’ ला पिपसाईट एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

कारेगाव (तेजस फडके) इंदोर (मध्यप्रदेश) येथे २० ते २४ डिसेंबर दरम्यान ‘द एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कुल’ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील शालेय नेमबाजी स्पर्धा २०२४-२५ पार पडल्या. यामध्ये कु श्रावणी संतोष वाळके हिने १० मीटर ‘पिपसाईट एअर रायफल’ या प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ४०० पैकी ३९६ गुणांची कमाई करत १७ वर्ष वयोगटाखालील मुली मधील सांघिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.

 

देशभरातील सर्व राज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शिरुर तालुक्याच्या बाभुळसर खुर्द गावातील श्रावणी वाळके हि कारेगाव मधील कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये ११ वी विज्ञान शाखेमध्ये शिकत आहे. शिरुर मधील ‘युनिक शुटिंग स्पोर्ट्स क्लब’ मध्ये सराव करत आहे. तिला क्लबचे प्रशिक्षक शरद तरटे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. कारेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्य स्नेहलता यादव यांनी श्रावणीच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.

शिरुरच्या पुर्व भागातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

2 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

2 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

3 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

3 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

3 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

5 तास ago