मुख्य बातम्या

शिरूर नगरपरिषदेकडून टोरंट गॅस कंपनीवर २५ हजारांचा दंड; बेकायदेशीर मशिनरी ठेवल्याचा प्रकार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत परवानगीशिवाय मशिनरी साहित्य ठेवणाऱ्या टोरंट गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर शिरूर नगरपरिषदेने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिली.

सदर प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. पाहणी दरम्यान कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या जागेत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता टोरंट गॅस कंपनीने मशिनरी साहित्य ठेवले असल्याचे स्पष्ट झाले.

टोरंट गॅस प्रा. लि. ही कंपनी सध्या शिरूर शहरात भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम करत आहे. या कामासाठी खोदकामाची परवानगी नगरपरिषदेकडून मिळालेली असली, तरी मशिनरी साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने ती न घेता थेट सरकारी जागेचा वापर केल्याने ही कारवाई करण्यात आली. पालिकेने कंपनीला ४८ तासांच्या आत खुलासा देण्याची नोटीस दिली होती. मात्र, संबंधित वेळेत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने कठोर पावले उचलत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

23 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago