मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण; दोन जणांवर गुन्हे दाखल

शिरुर: नातीची शाळेत छेड काढल्याच्या गैरसमजातुन शिरुर तालुक्यात एका 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याला वायरने पाठीवर, मानेवर, हातावर, तोंडावर अमानुषपणे मारहाण करत असताना त्या मुलाची आई मध्ये पडली असता तिलाही वायरने पाठीवर, पोटात तसेच पायावर मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन सदर महिलेच्या तक्रारीवरुन शिरुर पोलिसांनी याबाबत दोन जणांवर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

ranjangaon-mutadwar-darshan

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरदवाडी (ता. शिरुर) येथे फिर्यादी महिला आपल्या पती व दोन मुलांसह राहण्यास असुन (दि 27) रोजी या महिलेचा 12 वर्षीय मुलगा दुपारी 12:30 च्या सुमारास शाळेतून घरी आला आणि कपडे बदलून जवळच असलेल्या नातेवाईकांच्या घरी गेला. त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास फिर्यादी महिलेचा दुसरा मुलगा घाईघाईत घरी पळत आला. आणि त्याने ‘मम्मी लवकर चल येथील हॉटेल मेसाईचे मालक आपल्या भैयाला मारत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिला गडबडीत मेसाई हॉटेलचे मालक रंगनाथ कर्डीले यांच्या घरी गेल्या त्यावेळेस घराच्या बेसमेंटमध्ये रंगनाथ कर्डीले फिर्यादी महिलेच्या मुलास केबलच्या वायरने पाठीवर, मानेवर, हातावर तोंडावर मारहाण करीत होते तसेच विवेक रंगनाथ कर्डीले हा हाताने मारहाण करीत होता.

त्यावेळेस सदर महिलेने त्यांना माझ्या मुलाचं काही चुकलं असेल तर मला सांगा, त्याला मारु नका, त्याला सोडा असे म्हणतं त्यांची विनवणी करत मध्ये पडुन मुलास त्यांच्या तावडीतून वाचवन्याचा प्रयत्न केला. परंतु रंगनाथ कर्डीले याने फिर्यादी महिलेस जातिवाचक शिवीगाळ करत ‘तुम्ही बाहेरुन पोट भरायला आलात, नीट रहा नाहीतर तुझ्या पोराला शाळेतून काढून टाकायला लावील, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करीन. तुम्हाला जीवे मारील, तुमचा बिस्तारा गुंडाळुन तुम्हाला हाकलून देईल असे म्हणत फिर्यादी महिलेला वायरने पाठीवर, पोटात व पायावर मारहाण करत विनयभंग केला. त्यानंतर सदर महिला मुलाला घेऊन जवळच राहत असलेल्या नातेवाईकांकडे गेली. त्यानंतर नातेवाईकांना घेऊन तिने शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरुन रंगनाथ कर्डीले आणि विवेक रंगनाथ कर्डीले दोघेही (रा. सरदवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील तपास शिरुर विभागाचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

4 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

4 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

4 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

5 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

10 तास ago