मुख्य बातम्या

जातेगाव बुद्रुकमध्ये कात्रज डेअरीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

शिक्रापुर (शेरखान शेख) जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका कात्रज डेअरीच्या कर्मचाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन सदर घटनेत जयदीप सहदेव क्षिरसागर या कामगाराने आत्महत्या केली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जातेगाव बुद्रुक येथील जयदीप क्षिरसागर हा कात्रज डेअरी पुणे येथे नोकरीला असून सध्या सुट्टी असल्याने तो घरी आलेला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेजारील काही युवक जयदीपच्या घरी गेले असता त्यांना जयदीप याने घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान यावेळी काही नागरिकांनी त्याला खाली घेऊन शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता जयदीप सहदेव क्षिरसागर (वय ३०) रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेतील आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याबाबत पोपट बबनराव इंगवले (वय ४५) रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.

कात्रजच्या अध्यक्षांच्याच गावात कर्मचाऱ्याची आत्महत्या…
कात्रज दुध उत्पादक संघाच्या अध्यक्षा केशरताई सदाशिव पवार यांच्याचा गावातील कात्रज डेअरीचा कर्मचारी असेलल्या जयदीप क्षिरसागर याने अध्यक्षांच्याच गावात स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सदर घटना चर्चेचा विषय बनली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

2 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

9 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago