मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निर्वी आणि कवठे येमाई येथील दोन व्यक्तींविरुद्ध हि कारवाई करण्यात आली असून, एका प्रकरणात महावितरण कंपनीचे तब्बल १३ लाख ६७ हजार ९७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या प्रकरणात वैभव विजय सोनवणे (रा. गट नं. २३८, निर्वी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध वीजमीटरमध्ये अनधिकृतपणे छेडछाड करून मीटरचा डिस्प्ले व पल्स बंद केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्युत कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात अरुण रोहिदास वागदरे (रा. गट नं. ४७८, कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध ऑगस्ट २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन तब्बल ८१ हजार ९५२ युनिट वीजचोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महावितरण कंपनीचे १३ लाख ६७ हजार ९७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वायाळ करीत आहेत. या दोन्ही प्रकरणांमुळे शिरुर तालुक्यात वीजचोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

2 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

3 तास ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

18 तास ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

21 तास ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

24 तास ago

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…

1 दिवस ago