आरोग्य

दोन्ही हात एकमेकांवर घासणे

हिवाळ्यात अनेक जण दोन्ही हात एकमेकांना घासतात. हिवाळ्यात ही कॉमन बाब आहे. तसेच जर कुणाला चक्कर आली तर त्यांचेही हात किंवा पाय घासले जातात. पण यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे? जाणून घेऊया हातांचे बोटे एकमेकांवर घासल्याने होणारे फायदे.

ब्लड सर्कुलेशन वाढत: जेव्हा आपण तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यामुळे चांगलंही वाटतं. अशात दैनंदिन जीवनातील कामे करण्यासही काही समस्या येत नाही.

डोळ्यांना फायदा: दोन्ही हात एकमेकांवर घासल्याने डोळ्यांनाही फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. याने डोळ्यांच्या आजूबाजूला रक्तप्रवाह वाढतो. थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो. यासाठी सुरूवातीला हाताला हळूहळू रब करा आणि नंतर स्पीड वाढवा. जेव्हा हातात उष्णता येईल तेव्हा ते काही सेकंदासाठी डोळ्यांवर ठेवा, याने डोळ्यांना आराम मिळतो.

तणाव दूर होईल: हात एकमेकांवर घासल्याने आपल्या मानसिक आरोग्यालाही फायदे मिळतात. कारण याने मेंदू शांत होतो आणि त्याला आराम मिळतो. तसेच मेंदुची क्रियाही योग्य राहते. याने सकारात्मक वाटू लागतं. सकाळी उठल्यावर हॅंड रबिंग कराल तर तणाव मुक्त झाल्या सारखं वाटेल.

हिवाळ्यात फायदा: हिवाळ्यात हात नेहमीच थंड होतात. थंडी घालवण्यासाठी अनेक जण हात एकमेकांवर घासतात. असं केल्याने हातात आणि शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे बोटंही आखडली जातात. अशात हात घासल्याने स्नायू सक्रिय होतात आणि बोटांना आराम मिळतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

28 मिनिटे ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

21 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

21 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

22 तास ago