आरोग्य

पित्त होण्याची कारणे,-लक्षणे-घरगुती उपाय

पीत्ताचा त्रास का होतो…

चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात.

पित्त वाढण्याची कारणे

पित्त कशामुळे वाढते, काय खाल्याने पित्त वाढते.

वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे, तसेच

वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे,

उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे,

तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे,

मानसिक तणाव, राग यांमुळे,

वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे,

अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.

पित्तामुळे कोणकोणता त्रास होत असतो

पित्तामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होत असतात. यामध्ये, ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणे पित्तामुळे आंबट ढेकर येणे, मळमळणे, उलट्या होणे, छातीत व पोटात जळजळ होणे, अल्सर होणे, पित्तामुळे डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी),

डोळ्यांची आग होणे,

त्वचेवर पित्ताच्या गांधी उटणे अशा अनेक तक्रारी पित्तामुळे होत असतात.

पित्त कमी करण्यासाठी काय करावे

लाइफस्टाइलमध्ये बदल करा…

चुकीचा आहार, अयोग्य जीवनशैली यांमुळे पित्ताचा त्रास होत असतो. यासाठी हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारल्यास म्हणजे योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, तणावापासून आणि व्यसनांपासून दूर राहिल्यास पित्त तर कमी होईलच शिवाय आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.

हिरव्या पालेभाज्या खाव्यात

हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आहारात असाव्यात. विविध फळे खावीत. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन्स, खनिजतत्वे असतात. फायबर्समुळे नियमित पोट साफ होऊन पित्त कमी होते. आहारात आले, वेलदोडे, मिरी, मनुका, केळी, कारले, आवळा यांचा प्रामुख्याने समावेश करावा.

पित्त वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे

पित्त झाल्यावर काय खाऊ नये

चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, मांसाहार, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, कच्चे शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, चहा-कॉफी हे पदार्थ वारंवार खाणेपिणे टाळावे.

पित्त कमी करण्याचे उपाय

उपाशीपोटी फार वेळ राहू नये.

वेळेवर जेवण घ्यावे.

योग्य आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश असावा.

तेलकट, तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.

पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

रोज पोट साफ झाल्याने पित्त कमी होण्यास मदत होत असते. यासाठी पोट साफ राहील याची काळजी घ्यावी.

नियमित व्यायाम व योगासने करावे.

राग-चिंता-काळजी यावर नियंत्रण आणावे. ताण घेऊ नये.

जागरण करणे टाळावे, दिवसा झोपू नये.

स्मोकिंग, मद्यपान ह्या व्यसनांपासून दूर राहावे.

वारंवार डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या खाणे टाळावे. यासारखी काळजी घेतल्यास पित्त विकार होण्यापासून दूर राहता येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

1 तास ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

4 तास ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

5 तास ago

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…

8 तास ago

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

23 तास ago

महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात; पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र उभारणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…

1 दिवस ago