“एक मराठा, लाख मराठा” च्या गगनभेदी घोषणांनी शहर दणाणलं; गुलाल, फटाक्यांत जल्लोष
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर, मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर गेले चार दिवस सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाल्यानंतर शिरूरमध्ये मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. शासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेतल्याची माहिती दूरदर्शन वाहिन्यांवर झळकताच शिरूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला.
शहरातील बाजार समिती परिसरात शिवरायांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाज संघटना, सकल मराठा महासंघ, श्रीराम सेना आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मनोज जरांगे पाटील झिंदाबाद’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.या जल्लोषादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. भगवे झेंडे फडकावत, वाद्यांच्या तालावर नृत्य करत शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक विजय साजरा केला.
सुनिल जाधव, किरण पठारे पाटील, प्रा. सतीश धुमाळ, संभाजी कर्डिले, बाबूराव पाचंगे, संजय बारवकर, शामकांत वर्पे, सूरज पाचंगे, स्वप्निल रेड्डी, तुकाराम खोले, संपत दसगुडे, अविनाश जाधव, रमेश दसगुडे, महेंद्र येवले, किरण काळे, अक्षय जाधव, सागर नरवडे, नारायण काळे, कृणाल काळे, सिद्धांत चव्हाण, खुशालबापू गाडे, गणेश घाडगे, महेश देशमुख, तुषार भदाणे पाटील, दिनेश पडवळ, नितीन थोरात, नामदेव पावर, सावळेराम आवारी, अनिल डांगे, अनिल सोनवणे, महेश डेरे, रामभाऊ इंगळे, योगेश महाजन आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा भरघोस सहभाग होता.
कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी हाजी असिफ शेख, स्वप्निल रेड्डी, सचिन भोते यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची योग्य व्यवस्था केली. शासनाने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. यानंतर शिरूरमध्ये झालेल्या उत्सवाने मराठा समाजातील एकतेचा आणि लढ्याच्या ताकदीचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला.
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…
न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…