आरोग्य

फॅटला छुमंतर करण्यासाठी रोज रात्री प्या ‘हे’ हर्बल टी

आजकाल वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेस चांगले राहण्यासाठी लोकं व्यायामासोबतच आता आहाराकडे देखील लक्ष देत आहेत. विशेषत: ज्यांच्या पोटाचे फॅट खूपच वाढले आहे, अशी लोकं जिममध्ये जाऊन तीव्र व्यायाम करतात. पण तुम्ही दररोज रात्री हर्बल टी पिऊनही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यामुळे तुमचे फॅट जलद बर्न होईल.

हर्बल टी ही खास करून विविध वनस्पती, औषधी वनस्पती आणि मसाल्यांपासून बनवले जाते. त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी आणि पचन सुधारणारे गुणधर्म शरीरातील फॅट बर्न करण्याची प्रक्रिया सक्रिय करू शकतात. रात्री हर्बल टी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो आणि झोप सुधारते, त्यातच हे टी वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, ते योग्य पद्धतीने पिणे महत्वाचे आहे.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन नावाचे घटक चयापचय वाढवतात आणि फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगवान करतात. हे हर्बल टी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. एक कप ग्रीन टी बनवा आणि त्यात लिंबू किंवा मध मिक्स करा. तुम्ही रोज रात्री जेवणानंतर 30 -60 मिनिटांनी ग्रीन टीचे सेवन करा. याने तुमचे वजन देखील कमी होईल.

पुदिना चहा

हर्बल टी म्हणटंल की अनेकजण पुदिना चहाचे सेवन सर्वाधिक रित्या करत असतात. कारण या पुदिनाच्या चहाच्या सेवनाने शरीराची पचनसंस्था सुधारते. तसेच चयापचय वाढवते, ज्यामुळे पोटातील फॅट कमी होऊ शकते. पुदिन्याचा चहा प्यायल्याने पोटात जडपणा येत नाही. यासाठी तुम्ही नेहमी ताजी पुदिन्याची पाने उकळून त्यात तुम्हाला हवे असल्यास मध मिक्स करू चहा बनवा. हा पुदिना चहा झोपण्यापूर्वी प्या.

कॅमोमाइलचा चहा

कॅमोमाइल चहाच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो. पुरेशी झोप शरीरातील चयापचय संतुलित ठेवते, जे वजन कमी करण्यास मदत करते. कॅमोमाइल चहाचे सेवन केल्याने शरीरातील ताण कमी होतो, ज्यामुळे पोटातील फॅट कमी होते. कॅमोमाइल फुले एक कप पाण्यात उकळा घ्या.

झोपण्यापूर्वी 30-40 मिनिटांनी प्या.

हर्बल टी पिण्यासोबतच, तुम्हाला संतुलित आहार आणि नियमित व्यायाम देखील करणे आवश्यक आहे. नियमित आणि योग्य वेळी हर्बल टी पिल्याने चांगले परिणाम मिळू शकतात. फक्त खात्री करा की तुम्ही दिवसातून एक किंवा दोन कपपेक्षा जास्त पिऊ नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

20 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

21 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 दिवस ago