आरोग्य

थकवा, मूड स्विंग्स नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम

आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच जण खूप मेहनत करत असतात. बहुतेक ऑफिसची वेळ १० ते ६ पर्यंत असते, परंतु अनेक ऑफिसमध्ये वेगवेगळ्या शिफ्ट असतात. अशा परिस्थितीत कधी मॉर्निग शिफ्टमध्ये तर कधी नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. पण बरेच लोक कायमस्वरूपी नाइट शिफ्टमध्ये काम करतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दिनक्रम बदलतो. त्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो.

नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ते तंदुरुस्त, उत्साही आणि सक्रिय वाटत नाहीत. आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी असतात. त्यांना थकवा, अशक्तपणा जाणवतो, पचनाचा त्रास होतो. त्यामुळे नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतील.

नाइट शिफ्टमुळे डिप्रेशनचा धोका वाढतो, मूड स्विंग्स होतात, डायबेटिस होण्याची शक्यता आणि झोपेची कमतरता असल्याने अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाइट शिफ्ट असलेला जॉब सोडा. हे खरंच गरजेचं आहे पण काही लोकांसाठी हे प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यामुळे नाइट शिफ्ट करताना काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.

रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत काहीही खाऊ नका

रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत काहीही खाऊ नका. नाईट शिफ्ट करणाऱ्या खूप लोकांच्या त्यांच्या मॅनेजरपेक्षा स्विगी बॉयसोबत जास्त मिटींग असतात.

भरपूर पाणी प्या

या वेळेत तुम्हाला जर खूप भूक लागली तर कृपया जास्तीत जास्त पाणी प्या. मध्यरात्री स्नॅक्स किंवा काहीही खाणं टाळा.

प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार 

तुम्ही जे रात्रीचं जेवण जेवणार आहात ते पोषकत्त्वांनी परिपूर्ण असावं, प्रोटीन आणि फायबरयुक्त असावं. त्यामध्ये अंडी, पनीर, फळं अशा गोष्टींचा नक्की समावेश करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago