आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरेल. आज बोलताना सांभाळून राहा. दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होतील आणि त्याला कायदेशीर वळण मिळू शकते. सायंकाळच्या वेळी योजनांची पूर्ती होतील. पाहुणे आल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमचे काम आणि व्यस्तता दोन्ही वाढेल. आज मान, सन्मानात वाढ होईल आणि थांबलेली कामेही पूर्ण होतील.

वृषभ: तुमचा दिवस यशाचा राहील. कार्यालयात थोडे सांभाळून काम करा, अन्यथा वाद, बोलाचाली होऊ शकते. तुमच्या कार्यकौशल्याने आज तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल. आज घरातील लोक खरेदीसाठी जाऊ शकतात, आणि शुभ कार्यावर तुमचे पैसे खर्च होतील. शुभ खर्च झाल्याने वैवाहिक जीवनात सरसता राहील. समाजात मानसन्मान वाढेल.

मिथुन: आजचा दिवस यशाचा आहे, आणि तुम्हाला करिअरमध्ये मनासारखे यश मिळेल. राजकीय घडमोडींत काही अडथळे येऊ शकतात. दुपारनंतर तुम्ही काही नवीन करू शकता, त्यातून तुम्हाला लाभ होईल. तुमच्या चांगल्या कार्यातून काही लाभ होतील आणि आज तुमचे थकलेले पैसे हाती आल्याने जुन्या योजना पुन्हा मार्गी लागतील. धनवृद्धी होईल.

कर्क: आजचा दिवस करिअरमध्ये लाभ आणि यश मिळेल. जोडीदार आणि व्यापारातील भागीदार यांच्याकडून सहकार्य मिळेल आणि फायदा होईल. चांगल्या कामात रस वाढेल आणि नशिबाची साथ लाभेल. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. मनाला शांती लाभेल. जास्त कष्ट झाल्यामुळे थकवा येईल, पण यश मिळाल्यामुळे हा थकवा जाणवणार नाही.

सिंह: आजचा दिवस संमिश्र जाईल. तुम्हाला नोकरीत एखादी चांगली ऑफर येऊ शकते आणि तुम्हाला नशिबाची साथही मिळेल. तुमच्या ज्या योजना सुरू आहेत, त्यात थोडे सावध राहा. नोकरीत तुम्हाला पदोन्नतीची संधी मिळेल, आणि त्याच्याशी संबंधित योजना पूर्ण होतील. तुम्ही संकल्प केलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि मिळकतीही चांगली असेल, त्यामुळे मन प्रसन्न होईल.

कन्या: आज नशिबाची साथ मिळेल आणि व्यापारात चांगली संपत्ती प्राप्त होईल. समाजात तुमची मान आणि प्रतिष्ठा वाढेल, तसेच नशिबाची साथही लाभेल. आज जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तुम्हाला थोडे असहज वाटू शकते. घाबरू नका, कामावर लक्ष केंद्रित करा. जुने मित्र मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल आणि नवीन कार्य संपन्न होतील.

तूळ: आजचा दिवस तुमच्यासाठी सुखात वाढ होण्याचे योग आहेत. तुम्हाला प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य लाभेल. व्यावसायिक प्रयत्नांना यश येईल, मान प्रतिष्ठा यात वाढ होईल. सायंकाळी एखाद्या प्रवासात जाण्याचे योग बनतील. मौल्यवान वस्तू चोरी झाल्याने त्रास होईल. मोठे नुकसान होऊ शकते, सतर्क राहा.

वृश्चिक: आजचा दिवस शुभ आहे, आणि तुमचा दिवस परोपकारात जाईल. इतरांची मदत केल्यामुळे तुम्हाला समाधान प्राप्त होईल आणि तुमचे मन प्रसन्न होईल. कौटुंबिक सुखामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. ऑफिसमध्ये तुमच्या अधिकारात वाढ होईल, त्यामुळे तुमच्या काही सहकाऱ्यांच्या मनात मत्सराची भावना राहील. सायंकाळी धार्मिक कार्यात वेळ द्याल आणि तुमचे मन प्रसन्न होईल.

धनु: आज फार सावधरीत्या काम करावे लागणार आहे. तुमचे धैर्य आणि मृदू व्यवहार यामुळे वातावरण हलके करण्यात यशस्वी व्हाल, आणि प्रिय लोकांकडून तुम्हाला मदत मिळेल. सायंकाळच्या वेळी दुसऱ्या व्यक्तीमुळे त्रास होऊ शकतो. रात्रीचा वेळ आनंदात जाईल आणि तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील.

मकर: आजचा दिवस लाभाचा आणि यशाचा आहे. एखादी नवी डील निश्चित होईल आणि तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल, एकाच वेळी बराच पैसा मिळाल्याने तुमचा बँक बॅलन्स भरपूर सुधारेल. मैत्रित कोणतीही विशेष योजना आणू नका, अन्यथा नुकसान होईल. आज जोखीम पत्करू नका, आणि कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका.

कुंभ: आजचा दिवस भाग्यशाली राहील आणि तुमचे नशिब उजळून निघेल. एखाद्या मोठ्या यशामुळे आनंद होईल. मोठ्या प्रमाणावर पैसे हाती आल्याने आनंद होईल आणि दिवसाच्या उत्तरार्धात लाभ होतील. संवादातून विषय सोडवा. रात्रीचा वेळ आनंदात जाईल. दिवसाचा काही भाग फेरफटक्यात व्यतित कराल, तर मन प्रसन्न होईल. आज धनवृद्धी होईल.

मीन: आज करिअरमध्ये लाभचा दिवस आहे आणि तुम्हाला समाधानाचा अनुभव येईल. तुमच्यासाठी दिवस आनंददायी असेल. जे लोक व्यापार करतात ते आनंदित असतील, आणि तुमचा दिवस यशाचा राहील. काही लोकांना करिअरमध्ये प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात मान, प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. धनलाभ झाल्याने आनंद होईल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

15 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

15 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

15 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

23 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

24 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

24 तास ago