आरोग्य

पित्ताशयातील खडे नि घरगुती उपाय

आयुर्वेदानुसार तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

पित्त दोष: याच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात खडे तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे.

कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते, जे संपूर्णपणे पित्ताशयात जास्त चिकट पदार्थ तयार करतात.

वात दोष: पित्त आणि कफ दोषांच्या मिश्रणात कोरडेपणा वाढतो, ज्यामुळे खडे तयार होतात.

पंचकर्म चिकित्सा

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सेला खूप महत्त्व आहे. चुकीचा आहार आणि चुकीच्या दिनचर्येमुळे पित्त प्रधानआम दोष शरीरात वाढतो आणि ऋतूनुसार पंचकर्म न केल्यामुळे हा आजार दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या आजारावर पंचकर्मातील वमन, विरेचन तसेच औषधीय स्नान चिकित्सा, तसेच आवाहन स्वेद या क्रीया केल्यास त्रास कमी होण्यास मदत होते. यावर काही उपाय व औषधी आहेत ज्याचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास खडे विरघळण्यास निश्चितच मदत होते.

घरगुती उपचार

कडुनिंब आणि मोठी वेलची यांचे चूर्ण मिसळून खाल्ल्याने पित्तदुखी दूर होते.

मक्याचे तंतू किंवा केस पाण्यात उकळून त्याचे पाणी प्यावे. यामुळे काही दिवसात पित्ताचे खडे बरे होतात.

रोज आल्याचा चमचाभर रस घेणे फायदेशीर आहे.

कुळीथ मुठभर पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी उठून प्यावे. आहारात कुळीथाच्या डाळीचा समावेश करावा.

ग्लासभर सफरचंदाच्या रसात चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून घेतल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

रोज एक छोटा चमचा हळद कोमट पाण्यासोबत घेतल्यास खडे विरघळण्यास मदत होते.

गाजर,काकडी रस प्रत्येकी १०० मिली एकत्र करुन दिवसातून दोनदा प्यायल्यास फायदा होतो.

सकाळी रिकाम्या पोटी एक मध्यम लिंबाचा रस आठवडाभर प्यायल्याने फायदा होतो.

नाशपाती मध्ये आढळणाऱ्या रासायनिक घटकांमुळे खडे विरघळण्यास मदत होते.

आयुर्वेद तज्ञाच्या निर्देशानुसार ३० मिली ते ४० मिली ताजे गोमूत्र फिल्टर करून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. हे पित्त प्रवाह नियंत्रित करते, अतिरिक्त कोलेस्टेरॉलशी लढा देते, यकृत शुद्ध करते, कफ पचवते आणि विकृत वात व्यवस्थापित करते.

यकृतावर भृंगराजची मुख्य क्रिया पित्तप्रवाह सुधारते. हे एक उत्कृष्ट तहान,भूक वाढवणारे औषध आहे आणि पचनाला चालना देते आणि यकृत उत्तेजक म्हणून कार्य करते. त्यामुळे वात कमी होतो.

सैधव (रॉक मीठ) हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे जो पित्ताचा प्रवाह वाढवण्यास मदत करतो. रिकाम्या पोटी नाश्ता करण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा रॉक सैधव हे पेय घेतल्यानंतर उजव्या बाजूला सुमारे ४५ मिनिटे झोपावे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्याने परिणाम दिसून येतील.

गोखरू काढा किंवा पावडर घेणे लाभप्रद.

इसबगोल हे उत्तम असे विरघळणारे फायबर आहे. याच्या सेवनामुळे पोटात फायबरचे प्रमाण योग्य राहते आणि पित्ताशयातील खड्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

बर्बेरिस अरिस्टाटा याला दारुहरिद्र असेही म्हणतात. हे पित्त प्रवाह अवरोधित करण्यात मदत करते आणि अशा प्रकारे अडथळ्यामुळे होणारी तीक्ष्ण वेदना कमी करते. सतत वापर केल्याने नैसर्गिकरित्या पित्त खडे विरघळतात.

मिल्क थिस्ल नावाच्या गोळ्या बाजारात मिळतात. ज्यांच्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळतात.

एक कप पाण्यात सिंहपर्णीच्या पानाचे एक चमचा चुर्ण टाकून अर्धा तास भिजवून ठेवा. नंतर मध घालून ते पाणी प्यावे.

चमचाभर जास्वंदीच्या फुलांची पावडर एक चमचा मधात घेणे.

वासागुलुच्यादी कषायम, अविपित्तीकर चुर्ण, द्राक्षादी कषाय, वरूणादी कषाय, पटोलकतुरोहीन्यादी कषायम, त्रिविल लेहम, आरोग्यवर्धीनी, भुनिंबादी काढा, रोहितकारिष्ट इ. औषध तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे.

ताम्र सिंदूर, हजरुल यहूद भस्म, मेदोहरविडंगदी लौह, फलत्रिकादी क्वाथ अश्मरीहर रस, श्वेत पर्पटी, गोखरू क्वाथ इ. यासारख्या औषधींचा उपयोग आयुर्वेदिक वैद्याच्या सल्याने करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

12 तास ago

महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात; पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र उभारणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…

16 तास ago

बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली सूट दिली आहे का? फडणवीसांनी त्याला मुंबईत आणून चौकशी करावी

हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…

16 तास ago

‘SIR रद्द करा, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा द्या!’ युवक काँग्रेसचा एल्गार; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…

16 तास ago

सत्तेसाठी मराठा-ओबीसी संघर्ष पेटवला; फडणवीस-शिंदेंनी महाराष्ट्राचे नुकसान केले!

विजय वडेट्टीवारांचा घणाघात; जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक…

17 तास ago

जेवणानंतर विड्याचे पान का खातात? कारण जाणून घ्या

जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून…

17 तास ago