खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या घरातली प्रौढ मंडळीही तेच करत आहेत. बऱ्याचदा तर लहान मुलांच्या बाबतीत असंही होताना दिसतं की जोपर्यंत घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या हातात त्यांना मोबाईल दिसत नाही किंवा घरातलं कोणीही टीव्ही लावत नाही, तोपर्यंत त्यांना मोबाईल किंवा टीव्हीची आठवण येत नाही. पण घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात मोबाईल दिसला की मग लगेच ते मोबाईलसाठी हट्ट करायला सुरुवात करतात. यातला महत्त्वाचा मुद्दा हाच की हल्ली लहानांपासून अगदी वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलने वेड लावलं असून त्याचाच अतिवापर वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत आहे. त्या आजारांपैकीच एक आहे ब्रेन रॉट.
ब्रेन रॉट म्हणजे नेमका कोणता आजार
आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असते की थोडा मोकळा वेळ मिळाला की लगेच ते हातात मोबाईल घेऊन बसतात आणि रिल्स बघायला सुरुवात करतात. यापैकी बऱ्याच रिल्स अशाही असतात ज्यात त्यांना अजिबात रस नसतो.
पण तरीही समोर काहीतरी आलंय ना मग बघत बसायचं आणि एकानंतर एक स्क्रोलिंग करत जायचं. जोपर्यंत मोबाईलवर काही ना काही सुरू हाेत नाही तोपर्यंत या व्यक्तींचं कशातच लक्ष लागत नाही. हा एक प्रकारचा आजार असून त्यालाच ब्रेन रॉट म्हणतात.
ज्यांना ब्रेन रॉटचा त्रास असतो त्या व्यक्तींना कोणते ना कोणते रिल्स, व्हिडिओ किंवा मोबाईल पाहिल्याशिवाय अजिबात करमत नाही. त्यांची बौद्धिक क्षमता, विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते कारण मेंदू मोबाईल जे काही दाखवेल ते पाहण्यातच पुर्णवेळ गुंतलेला असतो. या लोकांमध्ये विसराळूपणाही वाढत जातो. तसेच एकाग्रताही हळूहळू कमी होत जाते. हल्ली अशी लक्षणं बऱ्याच लोकांमध्ये जाणवत आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि मोबाईलचा, रिल्स पाहात बसण्याचा अतिरेक टाळा.
(सोशल मीडियावरून साभार)
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…