आरोग्य

तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांद्यांचा, मंजीरीचा आणि खोडाचा औषधी उपयोग

तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांद्यांचा, मंजीरीचा आणि खोडाचा वापर औषधी म्हणून करता येतो.

ताप: ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. लहान मुलांना ताप आल्यानंतर तुळशीच्या तेलाने मालिश केल्याने ताप कमी करण्यास मदत होते. तुळशीची पाने कच्ची खाल्याने देखील ताप कमी होण्यास मदत होते.

दातांचं आरोग्य: दातदुखी, कमजोर हिरड्या, दातांतून रक्त येणे, दात किडणे यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो. दररोज 4 ते 5 तुळशीची पाने तोडांत ठेवल्यास चांगला फायदा होतो. आयुर्वेदामध्येही दातांचे आरोग्य राखण्यासाठी तुळस लाभदायी असल्याचे सांगितले आहे.

तोडांची दुर्गंधी: तुळशीच्या पानांचा उपयोग आपण मुखवास म्हणूनही करू शकतो. तोंडातून दुर्गंधी येणे, चव नसणे, तोंड कोरडे पडणे यांवर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचं सेवन करू शकता. तुळशीच्या पानांमधील पोषक तत्व तोंडात लपलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास प्रभावी ठरतात. त्यामुळे तुळशीच्या पानांचं सेवन केल्यावर श्वास घेतल्यास ताजंतवानं वाटतं.

त्वचेची काळजी: तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचप्रमाणे यात व्हिटमिन ए आणि बी असतात भरपूर असतात. त्यामुळे त्वचेवरील इन्फेक्शने, त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचा फार उपयोग होतो. तसेच तुळशीची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा टवटवीत होते. तुळशीच्या पानांचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठीही होतो.

मधुमेहावर नियंत्रण: तुळशीमध्ये असलेलं इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतं. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते.

मेटाबॉलिज्म: तुळशीची पानं आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे मेटाबॉलिज्म सिस्टीम दुरुस्त होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त तुळशीची पानं गॅस एसिडीटीसारख्या डाएजेशन डिसॉर्डरपासूनही आराम मिळवून देतात.

बॉडी डिटॉक्सीफिकेशन: तुळशीच्या पानांमध्ये बॉडी डिटॉक्स करण्याची क्षमता असते. याचे गुणकारी तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

खोकला-सर्दी: हिवाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकल्याची समस्या जाणवणं कॉमन आहे. अशा स्थितीत आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुळशीची पानं चघळलीत तर नक्कीच फायदा होईल. तुम्ही काढा किंवा चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

11 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

11 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

15 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

15 तास ago