आरोग्य

शरीराच्या या अवयवांमध्ये वेदना म्हणजे धोक्याचा इशारा, हाय कोलेस्टेरॉलचा असू शकतो संकेत

हाय कोलेस्टेरॉल हे हृदयरोग आणि हार्ट अटॅकला जबाबदार ठरतं. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत आहे. जर एकदा का शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. इतकंच नाही तर जीवालाही धोका होतो. कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात काही लक्षणं दिसतात जी तुम्हाला माहीत असायला हवीत. जेणेकरून वेळीच उपचार घेऊन गंभीर धोका टाळला येईल.

मान-खांदे-पाठीत वेदना: शरीरात जर कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं तर तुमची मान आणि खांदे दुखतात किंवा हे अवयव अखडतात. सतत डोकं दुखणे किंवा चक्कर येणे हे सुद्धा कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत आहेत. हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येमुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात.

छातीत वेदना: नेहमीच तुमच्या छातीत दुखत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. छातीत वेदनेचं कारण अ‍ॅसिडिटी किंवा गॅस समजण्याची चूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण कोलेस्टेरॉल वाढल्यानं हृदयापर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. ज्यामुळे हृदयावरील दबाव वाढतो. छातीत वेदना किंवा आखडल्यासारखं वाटत असेल तर हा हाय कोलेस्टेरॉलचा संकेत असू शकतो.

पायांमध्ये वेदना: कोलेस्टेरॉल वाढल्यामुळं पायांमधील ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. पायांमध्ये ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत नसल्यानं पायांमध्ये वेदना, आखडलेपणा किंवा थकवा जाणवतो. जर तुम्हाला ही लक्षण एकत्र दिसत असतील तर वेळीच चेकअप करावं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

4 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

5 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

5 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

5 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

5 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

7 तास ago