थंडी, वातावरणातील बदल, प्रदूषण, चुकीचा आहार या गोष्टींमुळे अनेकांना नेहमीच कोरडा खोकला होत राहतो.कोरडा खोकला म्हणजे मोठी डोकेदुखी, कारण हा झाला तर जराही चैन पडत नाही. खोकून खोकून घसा, छाती दुखायला लागते. ना धड काम होत ना आराम मिळत. सामान्यपणे कोरडा खोकला झाला की बरेच लोक लगेच औषधे किंवा सिरप घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कोरडा खोकला घालवण्याचे नॅचरल उपाय आपल्या किचनमध्येच असतात. आयुर्वेदानुसार काही औषधी वनस्पतींचा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आहारात समावेश केल्यास कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळू शकतो. चला तर मग अशाच काही उपयुक्त औषधी घटकांबद्दल जाणून घेऊया.
कोरडा खोकला दूर करण्याचे उपाय
मध: मध घशासाठी खूपच फायदेशीर मानलं जातं. तुम्ही फक्त एक ते दोन चमचे मध कोमट पाण्यासोबत सेवन करा. कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी हा नैसर्गिक उपाय नक्की करून पाहू शकता. मधाने घशाला शेक मिळतो आणि खोकला कमी होतो.
जेष्ठमध: जुन्या काळापासून घशाच्या त्रासावर जेष्ठमध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जेष्ठमधामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आढळतात. कोरड्या खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी जेष्ठमधाचा काढा करून प्या. हवं असल्यास जेष्ठमधाची मुळे चघळू शकता.
आले: घसा दुखत असताना आजी-दादी आल्याचा चहा पिण्याचा सल्ला द्यायच्या. आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आल्याचा रस मधासोबत घेतल्यास कोरड्या खोकल्यावर आराम मिळू शकतो.
हळद: हळद आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते हळदीचे सेवन घशासाठी उपयुक्त आहे. कोरड्या खोकल्यापासून सुटका हवी असल्यास आहारात पोषक घटकांनी भरलेले हळदीचे दूध नक्की समाविष्ट करा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…