मुलं असो किंवा म्हातारी माणसं. गोड खाल्ल्यानंतर दातांची स्वच्छता करण्यात निष्काळजीपणा केल्यास दातांमध्ये किड लागू शकते. ज्यामुळे दात पूर्णपणे खराब होतात.अशावेळी लोकांना डेंटिस्टकडे जावं लागत आणि दात काढून टाकले जातात. कारण यामुळे दुसरे दातही खराब होण्याचा धोका असतो. आजी आजोबांनी पूर्वी सांगितलेला हा उपाय करून तुम्ही दातांना लागलेली किड सहज काढून टाकू शकता. एक घरगुती उपाय करून तु्म्ही दातांना लागलेली किड सहज बाहेर काढू शकता.
दातांना कीड लागली असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी मोहोरीच्या तेलात हळद आणि मीठ मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांना लावून ब्रशच्या साहाय्यानं किड काढून घ्या, नंतर ब्रश करा. दिवसातून २ वेळा हा उपाय केल्यास दातांची किड सहज बाहेर येईल आणि दात स्वच्छ होण्यास मदत होईल.
दातांची किड बाहेर काढण्यासाठी तुम्ही तुरटीच्या पावडरचा वापर करू शकता. यात सैंधव मीठ मिसळून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट दातांना लावून ब्रश करा. असं केल्यानं दातांना लागलेली किड सहज बाहेर निघण्यास मदत होईल.
दातांना किड लागली असेल तर या पासून आराम मिळवण्याासठी तुम्ही लवंगाचं तेल वापरू शकता. हे तेल काही वेळासाठी दातांवर लावून ठेवा. रोज असं केल्यानं दातांची किड निघून जाण्यास मदत होईल आणि दात दुखीच्या वेदनांपासूनही आराम मिळेल.
हिंगाची पावडर दातांना लावून तुम्ही दातदुखीच्या, दात किडन्याच्या त्रासापासून आराम मिळवू शकता. हा उपाय करण्यासाठी हिंगाची पावडर पाण्यात घालून उकळवून घ्या नंतर कोमट झाल्यानंतर हे पाणी उकळवून या पाण्यानं गुळण्या करा. ज्यामुळे दातांची किड निघून जाण्यास मदत होईल.
(सोशल मीडियावरून साभार)
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…