आरोग्य

कॅल्शियम कमी झाल्यास करा हे घरगुती उपाय

धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात, थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते, त्यासाठी औषधाची गरज नाही.

दूध: गाईचे दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्ती सुध्दा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते (देशी गाईचे दुध, दही आसावे).

दही: दही मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दही मध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ सेवन करून कॅल्शियम मिळते.

पालेभाज्या: हिरव्या पालेभाज्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, इ.

शेंगभाज्या: शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीन सोबतच कॅल्शियम मिळते.

संत्री-लिंबू: यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

सोयाबीन: सोयाबीन पौष्टिक असून यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.

गूळ: गुळात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळात कॅल्शियम सोबतच फॉस्फोरस सुद्धा असते, जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.

तीळ: भाकरीला तीळ लावून खाणे किंवा जेवणा नंतर एक ते दोन चमचे तीळ खाणे उत्तम.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

3 तास ago