Five best vitamins for beautiful skin. Products with vitamins A, B, C, E, K - broccoli, sweet potatoes, orange, avocado, spinach, peppers, olive oil, dairy, beets, cucumber, beens. Flat lay, top view
अ(A):- प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते.पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते.
ब १(B1):- पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते.
ब२ (B2):- मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते. यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध यातून मिळते.
ब३ (B3):- कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट यातून मिळते.
ब ५ (B5):- शरीरातील शक्ती वाढवते. धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
ब६ (B6):- प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते. सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया यातून मिळते.
ब १२(B12):- पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग. यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ यातून मिळते.
फॉलिक ऍसिड:- लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते). गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस यातून मिळते.
क(C):- प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते. लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे यातून मिळते.
ड(D):- कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
इ(E): रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते.लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा यातून मिळते.
फ(F):- कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते. दाणे, काजू यातून मिळते.
के(K):- रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
(सोशल मीडियावरुन साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…