आरोग्य

पक्षाघात आजार म्हणजे काय व त्याची माहिती

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पक्षाघाताची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिली आहे.

पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते.

पक्षाघाताचे प्रकार

पक्षाघाताचे दोन प्रमुख प्रकार असतात.

1) Ischemic पक्षाघात:- या प्रकारात मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते त्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागास रक्ताचा पुरवठा बंद झाल्यामुळे पक्षाघात होतो.

2) ‎Hemorrhagic पक्षाघात:- या प्रकारात मेंदुमधील रक्तवाहिन्या फुटून मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात होतो. पक्षाघाताचा झटका आल्यावर सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनद्वारे कोणता प्रकार आहे ते उपचार करण्यापूर्वी तपासले जाते.

3) Transient Ischemic Attack म्हणजे TIA नावाचा एक तिसरा प्रकारही असतो. यामध्ये पक्षाघाताची लक्षणे 24 तासाच्या आत निघून जातात आणि रुग्ण पूर्ववत बरा होतो. मात्र TIA ही Warning असते. एकदा TIA येऊन गेल्यास योग्य उपचार न केल्यास आपणास पुढे पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तेंव्हा TIA येऊन गेल्याससुध्दा डॉक्टरांकडून निदान आणि उपचार करुन घ्यावेत. त्यामुळे पक्षाघाताचा धोका टळण्यास मदत होईल.

पक्षाघाताची लक्षणे

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.

एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.

हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.

तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.

अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.

चक्कर येणे, तोल जाणे,

चेतना कमी होणे

तीव्र डोकेदूखी

ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.

लक्षात ठेवा ‘FAST’

पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यासाठी ‘FAST’ लक्षात ठेवा..

F – Face (Facial Weakness):- रुग्णास हसण्यास सांगा. हसताना एका बाजूचा चेहरा, ओठ आणि डोळे लटकलेले दिसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

A – Arms (Arm Weakness):- रुग्णाला त्याचे दोन्ही हात पुढे व वर उचलण्यास सांगा. जर रुग्णाचा एक हात वर व समोर उचलता येत नसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

S – Speech Difficulty):- रुग्णास प्रश्न विचारून तो व्यवस्थित बोलतो का ते पहा. जर त्याला बोलताना त्रास होत असल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

T – Time (Time to Act):- कोणतीही कृती करताना किंवा प्रतिक्रिया देताना सामान्य प्रतिक्रिया न आढळता त्यामध्ये विसंगती आढळते

वरील लक्षणे रुग्णामध्ये जास्त प्रमाणात दिसून आल्यास वेळ न दवडता रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्या. पक्षाघाताचा झटका आल्यानंतरची पहिले 3 तास हे Golden Period असतात ह्या काळामध्ये रुग्णावर उपचार केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो तसेच पक्षाघाताच्या झटक्यामुळे मेंदूमध्ये होणारा बिघाड थांबवता येऊ शकतो. रुग्णास वेळीच उपचार मिळाल्यास पुढील मोठा धोका टळू शकतो.

वरील लक्षणे जर कमी प्रमाणात जाणवत असतील तर निगेटीव्ह आयनची टोपी मिळते ती वापरण्यास सुरुवात करावी व मेंदूचे रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी हर्बल ट्रीटमेंट घेणे उत्तम ज्यायोगे मेंदूचे रक्ताभिसरण (Brain Circulation) सुरळीत होऊ शकेल व संभाव्य धोका टळू शकेल.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago