आरोग्य

कोणत्या समस्येत कशाच्या बीया आणि मसाल्यांचं करावं सेवन

किचनमध्ये आरोग्याचा खजिना असतो असं म्हटलं जातं. कारण किचनमध्ये उपचारांमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या अनेक गोष्टी असतात. ज्यात अनेक मसाले, बियांचा समावेश असतो. शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी या गोष्टींचा फायदा होतो. मात्र, लोकांना याबाबत फार माहिती नसते.

हाय ब्लड शुगर

डायटिशिअननुसार, हाय ब्लड शुगर असलेले लोक मेथीच्या दाण्यांचं सेवन करू शकतात. मेथीचे दाणे भिजवून खाऊ शकता किंवा यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश करु शकता.

केसगळती

अनेकांचं आजकाल कमी वयातच केसगळतीची समस्या होऊन टक्कल पडतं. तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर तुम्ही चिया सीड्सचं सेवन करू शकता. चिया सीड्सच्या सेवनाने केसांसंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

अ‍ॅसिडिटी

अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी ओव्याचं सेवन करू शकता. ओवा पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतो. ओवा उकडून याचं पाणी सेवन करू शकता किंवा भाजूनही खाऊ शकता.

हाय इन्फ्लेमेशन

शरीरात हाय इन्फ्लेमेशन म्हणजे एखाद्या भागात सूज किंवा उष्णता वाढली असेल तर त्यासाठी कलौंजीच्या बियांचं सेवन करू शकता. कलौंजीच्या बियांमध्ये ॲटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात.

बद्धकोष्ठता

पोट बरोबर साफ होत नसेल तर त्याला बद्धकोष्ठता म्हटलं जातं. जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने हैराण असाल तर अळशीच्या बियांचं सेवन करू शकता. अळशीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असतं आणि याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर केली जाऊ शकते. तसेच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते.

फर्टिलिटी समस्या

डायटिशिअननुसार, ज्या लोकांना फर्टिलिटीसंबंधी समस्या होतात, त्यांच्यासाठी भोपळ्याच्या बीया फायदेशीर ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्व, व्हिटॅमिन आणि आवश्यक खनिज असतात.

थायरॉइड अंसतुलन

थायरॉइडने ग्रस्त लोकांसाठी धणे फायदेशीर ठरतात. धणे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकण्यासोबतच याच्या पाण्याचंही सेवन करू शकता. एक ग्लास पाण्यात रात्रभर धणे भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून सेवन करू शकता.

उष्णतेपासून वाचण्यासाठी

जर तुम्हाला जास्तच गरमी लागत असेल तर तुम्ही बेजिल सीड्सचं सेवन करू शकता. बेजिल सीड्स थंड असतात आणि याच्या सेवनाने शरीर आतून थंड राहत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

10 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

10 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

10 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

10 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

10 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

10 तास ago