चक्कर येण्याची कारणे एवढी आहेत की, नुसती वाचतानाच चक्कर येईल. ‘चक्कर येणे’ म्हणजे गरगरणे. अर्थात त्या व्यक्तीस स्वत:/आजुबाजुचे जग गरगर फिरते आहे, अशी भावना होणे.
काही रोगांमध्ये गरगरणे/ चक्कर येणे एवढाच त्रास होतो. काही आजारांमध्ये मात्र डोळ्यांपुढे अंधारी येणे, उभे असल्यास खाली पडणे, बेशुद्ध होणे आदी घटना ही घडतात. नुसते गरगरणे/ चक्कर येणे त्रास अंतकर्ण, त्याच्याशी संबंधित मेंदुचा भाग यांच्या आजारांमुळे होतो.
बस लागण्याचा प्रकारही अंतकर्णाच्या संवे- दनशीलतेमुळेच होतो. अति रक्त -दाब असताना अचानक उभे राहणे, अल्परक्त दाब, पोटातील चलनवलन एकदम बदलले/ अतिवेदनेमुळे मज्जासंस्थेवर होणारा तात्पुरता परिणाम इ. कारणांमुळे मेंदुला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो व चक्कर आल्यानंतर व्यक्ती खाली पडते/ जागच्या जागी बेशुद्ध होते. खाली पडल्यानंतर जेव्हा मेंदुचा रक्तपुरवठा सुधारतो तेव्हा व्यक्ती शुद्धीवर येते.
रक्तस्त्राव, ह्रदयविकार, खूप जुलाब उलट्या यांमुळे झालेले निर्जलिकरण, मेंदुतील रक्तस्त्राव इ.मध्ये मेंदुचा रक्तपुरवठा लवकर नीट होत नाही; त्यामुळे बेशुद्धी जास्त वेळ राहते. रक्त- पांढरी, खूप ताप, दृष्टिदोष, रक्ता तील साखरेचे प्रमाण कमी होणे इ.मुळे चक्कर येते/ तशी भावना होते. यावरून लक्षात येईल की, चक्कर येण्याची काही कारणे सौम्य रोग्यांची तर काही अत्यंत गंभीर रोगांची लक्षणे आहेत. त्यामुळे चक्कर येणार्या व्यक्तीस तात्काळ डाॅक्टरांना दाखवावे, हेच योग्य. घरगुती उपायांमुळे मौल्यवान वेळ वाया जाऊ शकेल व प्रसंगी रुग्ण दगावण्याची/ त्याला कायमचे अपंगत्व येण्याची वेळ येऊ शकेल.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…